
ओझर: (वार्ताहर) प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी माता बालसंगोपन डॉ हर्षल नेहते, अती.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ लोणे, डॉ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली HPV लसीकरण कु अन्वीता नितीन संगमनेरे हिला करण्यात आले. आई सौ जयश्री नितीन संगमनेरे यांनी उद्घाटन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुजित कोशीरे तसेच पीएचएस डॉ निलेश चव्हाण डॉ आनंद सुर्वे डॉ प्राची पवार डॉ मंजिरी सराफ आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही लस नियमितपणे दररोज 9 ते 2 या वेळेत ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहील. मात्र येताना आधारकार्ड, मोबाईल नंबर, सोबत पालक व जेवण करून यावे. लस घेण्यापूर्वी वैद्यकीय अधिकारी लाभार्थींची तपासणी केल्यानंतर लसीकरण होईल. विद्यार्थिनींना सोबत लसीकरण सर्टिफिकेट देण्यात येईल. सदर लस वय 14 वर्ष पूर्ण असेल व 15 वर्षाच्या आतील मुलींना देण्यात येणार आहे.
