
ओझर: (वार्ताहर)येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात ‘मविप्र’ संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा स्मृतिदिन, कर्म.ॲड बाबुराव ठाकरे व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते पूजन झाले. अध्यक्षीय भाषणात आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या स्मृति दिनानिमित्त व कर्म.ॲड बाबुराव ठाकरे व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर सखोल माहिती मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी विद्यालयाच्या रेखा देशमाने मंगल सावंत सरोज खालकर जागृती परदेशी स्वाती देवरे सुप्रिया भंडारे वनिता शिंदे मोहिनी चौधरी निकिता रकीबे नयना कावळे अश्विनी ठाकरे पल्लवी गायकवाड अर्चना घुमरे शताक्षी पुरकर शितल हांडोरे रूपाली जाधव स्वाती बोरसे आत्माराम शिंदे यश बोरसे प्रभाकर लवांड महेंद्र डांगळे बाबासाहेब लभडे बाबासाहेब गायकवाड महेश पिंगळ सुनील पाटील दादासाहेब सोनवणे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इ आठवी क च्या विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक नरेंद्र डेरले यांनी केले. कार्यक्रमाचे फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने कर्मवीर ॲड ठाकरेंच्या कार्यावर गुणगान गायले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले.आभार शिक्षिका जागृती परदेशी, स्वाती देवरे यांनी मानले.
