
नांदगाव (वार्ताहार ) नांदगाव येथील वैजनाथ (व्हि.जे.) विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.ह्यावेळी निमित्त होते स्त्री शक्तीचा जागर,महिला सबलीकरण ह्या संकल्पनेतून नांदगावचे सुप्रसिद्ध डॉ.कै.यशवंत (दादा) बर्वे प्रेरित शहरातील प्रथम महिला वैद्य डॉ.कै.सुमनताई यशवंत बर्वे स्मरणार्थ जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळ्याचे…! ह्यावेळी त्यांचा कार्य-परिचय करण्यात येऊन व्याख्यानात श्रीमती. जुई पेठे बोलत होत्या.

व्यासपीठावर मुख्य सन्मानार्थी श्रीमती. रुई पेठे डॉ. जयंत बर्वे, श्री. उमेश कुलकर्णी, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजीव धामणे मुखाध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आरंभ मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वतीचे पूजन व कै.बर्वे दाम्पत्य ह्यांच्या प्रतिमपूजनाने झाला. श्रीमती. सुनीता देवरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इ. ९वी तील विद्यार्थिनी कु.मृणाल बोरसे, कु. आरती खाडे ह्यांनी स्वागतगीतही ह्यावेळी सादर केले.
मान.श्री.जयंत बर्वे ह्यांचेकडून आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ नांदगावशी असलेली आपली अभिमानास्पद नाळ जपण्याच्या भावनेतून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम विद्यालयात सुरू असल्याचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.

समाजाचे कल्याण आणि पर्यावरणाचे संरक्षण हे एकमेकांशी अविभाज्यपणे जोडलेले आहे. समाज सक्षम झाला तर पर्यावरण जपले जाईल आणि पर्यावरण सुरक्षित राहिले तर समाजाचे भविष्यही सुरक्षित राहील. पर्यावरण संरक्षणासाठी जैवविविधता संशोधक श्रीमती. जुई पेठे ह्यांनी एकप्रकारे ह्या कामी स्वतःला वाहून घेतल्याचेही त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.

शाळेप्रती असलेल्या प्रेमामुळे वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही माजी विद्यार्थी येथील कसरतपटू मान. श्री. उमेश कुलकर्णी हे विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व, मुलींना आत्मसुरक्षेचे महत्व, गुरुजनांचा आदर आदी मौलिक सांगितल्या
शेवटी कै.सुमनताई व सत्कारमूर्ती श्रीम. रुई पेठे कार्याचा भूषणावह वारसा शब्दबद्ध करणाऱ्या स्वरचित काव्यपंक्तिचेही वाचन करून श्री. ठाकरे ह्यांनी प्रास्ताविकाचा समारोप केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजीव धामणे मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर अतिथींसह तसेच सर्व महिला व प्रतिष्ठित नागरिकांचे पुष्प देऊन स्वागत उपमुख्या .डॉ. जोगेश्वर नांदुरकर , विद्यालयातील शिक्षिका श्रीमती. सुनीता देवरे, श्रीमती. निवेदिता ह्यांनी केले.
प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ.श्री. जयंत बर्वे ह्यांनी सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करत समाजकार्याची गरज स्पष्ट केली. “आपली जन्मभूमी आणि समाजाशी असलेले नाते जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे..!” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजासाठी समाजकार्य करण्याची प्रेरणा दिली विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका, कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन ह्यावेळी स्वागत केले. सकाळ सत्र शिक्षक प्रतिनिधी श्री. प्रविण अहिरे यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲकॅडमिक सदस्या व शि सौ.रूपाली झोडगेकर ह्यांनी केले.
सत्र शिक्षक प्रतिनिधी श्री. सुरेश नवसारे, दोनही सत्रातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर सहकारी ह्यांचेसह नांदगाव शहरातील विद्यार्थ्यांच्या माता पालक, जायंट्स क्लब सदस्या, प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार, विद्यार्थ्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते._
