
चापडगाव ( प्रतिनिधी ) शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक अनिकेत अॅग्रो सर्व्हिसेस फर्मचे मालक मा गंगाधर गोरे यांनी चापडगाव जिल्हा परिषद शाळेच्या बालमंचावर दैनिक परिपाठ फॅशन शो वक्तृत्त्व कला काव्य नाटय व विशेष सांस्कृतिक उपक्रम साजरे करण्यासाठी ५१ हजार रुपयांचे भक्कमछत देऊन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात व शाळेच्या वैभवात मोलाची भर घातली.

गंगाधर गोरे हे चापडगाव जिल्हा परिषद शाळेचे मितभाषी माजी विद्यार्थी असून आपल्या मनगटातील ताकदीवर व परिश्रमावर विश्वास ठेवत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत स्वतःची शेती फुलवित शेतकऱ्यांना माफक दरात कृषी सेवा पुरविण्यासाठी व्यवसायाला सुरुवात केली . शाळेच्या बांधकामावर श्रमदान करणारा सामान्य मजूर ते अनिकेत अॅग्रो सर्व्हिसेसचा मालक असा दैदिप्यमान यशस्वी प्रवास आहे . ज्याशाळेत शिकलो त्या संस्काराची खाण असलेल्या शाळेचे उत्तरदायित्त्व म्हणून सामान्य विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठावर भक्कम छत उपलब्ध करून दिले आहे
भविष्यात ग्रामीण भागातील युवक युवतींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यामातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविण्यासाठी मित्र परिवाराच्या सहकार्यातून सामान्य ज्ञानाची पुस्तके, ,अभ्यासिका, वाचनालय व ग्रंथालय उभारण्याचा त्यांचा मानस असून हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थी युवक युवतींना ही एक प्रेरक संजीवनी देणारा ठरणार आहे .
याबद्दल मुख्याध्यापक, ,शिक्षक ,ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य,सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ सर्व समिती सदस्य व प्रंचक्रोशीतील नागरिकां कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
