

पिंपळगाव बसवंत (प्रतिनिधी). ता ७महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) अंतर्गत समग्र शिक्षा अभियानांतर्गत आणि पिएमश्री अंतर्गत ग्रंथालय समृद्धी राज्यस्तरीय उपक्रमासाठी राज्यातील शिक्षकांचे लिखाण मागविण्यात आले होते. यातून नाशिक जिल्ह्यातून नऊ शिक्षकांच्या पुस्तकांची राज्यस्तरावर निवड होत ह्या पुस्तकांचे प्रकाशन झाले .महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील सर्व शाळांना ही पुस्तके पोहोच झाली आहेत.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने महाराष्ट्र राज्यातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ग्रंथालय विकसन कार्यशाळा घेऊन पुस्तक निर्मिती केलेली आहे.

त्यात नाशिक जिल्हांतर्गत कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उदंड सहभाग नोंदविला. जिल्हास्तरावर निवड झालेल्या पुस्तकांना राज्यस्तरीय परीक्षण व निवडीसाठी पाठविले होते. त्यातून जिल्ह्यातील नऊ लेखक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ग्रंथांची निवड झालेली आहे.ह्या पैकी सहा पुस्तकांचे राज्यस्तरावर प्रकाशन होवून जिल्ह्यातील शाळांना याचे वितरण झाले आहे.निवड झालेल्या शिक्षक व पुस्तकांची नावे.निगडोळ ता. दिंडोरी राजेंद्र उगले यांच्या सुंदर माझे घर, पिंपळगाव बसवंत नं 2 ता. निफाड शाळेच्या शिक्षिका सौ.वैशाली शिंदे यांचे मजेमजेची गंमत गाणी बालगीते, खालप फाटा लोहोणेर ता देवळा शाळेच्या शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या बालरंग, आमडोंगरा ता .पेठ येथील देवदत्त हरी चौधरी यांच्या माकडाच्या हाती मोबाईल, नाशिक येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेच्या विजया दुधारे यांच्या सफर फळांच्या जगाची व दिंडोरी येथील आरती डिंगोरे यांच्या काव्यकोडी अशा पुस्तकांची निवड होत पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे.दिंडोरी तालुक्यातील शिक्षक हातनोरे अरुण इंगळे यांचे काळजात मेलेलं स्वप्न आणि पुस्तक वेडा न्हावी ही पुस्तके संपादित झाले आहेत.ते ही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.त्यामुळे ह्या लेखक शिक्षकांची पुस्तके महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेच्या वाचनालयात पोहोचणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत राज्यस्तरावर झालेली निवड ही अत्यंत अभिमानास्पद अशी आहे. त्यामुळे पुस्तक व सर्व लेखकांचे जिल्हाभरातून सर्वत्र कौतुक होत आहे.सर्व प्रकाशित पुस्तकांच्या लेखकांची फोटो
