
पारोळा ( प्रतिनिधी ) रविवार दि. 06/01/2025 वार- रविवार रोजी आपल्या चामुंडा माता बहुउद्देशिय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा, पारोळा येथे मा.श्री.दिनेश शेलकर सर (मा. सचिव क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात) (अध्यक्ष. अमळनेर तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल ) यांचा वाढदिवसानिमित्त संस्थेला 11000 रुपयाची देणगी देण्यात आली व विशेष विद्यार्थ्यांना मीष्ठांन जेवण देण्यात आले. त्यावेळेस सौ लताबाई दिनेश शेलकर शेलकर (सामाजिक कार्यकर्ता), तसेच श्री बापु जुलाल पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनीही 2100/- रुपये देणगी दिली, श्री. तुळशीराम तुकाराम महाजन (सामाजिक कार्यकर्ते), श्री. रतिलाल गिरधर चव्हाण (से. नि. नायब तहसीलदार), सौ मंगला रचलाल चव्हाण (मा. अध्यक्ष महिला मंडळ अमळनेर), श्री. देवाजी सहाडू महाजन (सामाजिक कार्यकर्ते), श्री. रवींद्र सुरेश महाजन (गायत्री अॅग्रो एजन्सी पारोळा) , सौ. प्रतिमा रवींद्र महाजन (गायत्री अॅग्रो एजन्सी पारोळा), सौ सिंधू सुरेश महाजन, कमलेश चंद्रकांत माळी हे सहभागी होते व अण्णासो. डॉ. योगेश रघुनाथ महाजन सर, (अध्यक्ष परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी शाळा पारोळा) यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा स्वागत करण्यात आले.सूत्रसंचालन जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
