

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६९ वा दिवस*
या समस्त जगात हेच सत्य तत्व आहे की, भय हेच अधःपतनाची व पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो, भयामुळेच सार्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात. या भयाचे कारण कोणते आहे? आपल्या खऱ्या स्वरूपाच्या संबंधी आपल्यात असलेले अज्ञान हेच आपल्या भयाचे कारण होय. आपल्यापैकी प्रत्येक जण त्या परमेश्वराचा वारसदार आहे. याचा आपल्याला विसर पडल्यामुळेच भय उत्पन्न होते. स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १७ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ७ एप्रिल २०२५
★१८९१ जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा जन्मदिन
★ १९२० प्रसिध्द सतारवादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचा जन्मदिन
★ १९४८ जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली.
★ जागतिक आरोग्य दिन.

