
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
इगतपुरी नगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी इगतपुरी शहरातील भाजपचे युवा नेते, तथा सामाजिक चळवळीत अग्रणी असणारे किरण फलटणकर यांची नियुक्ती करणेत आली आहे.
सामाजिक चळवळीत सातत्याने अग्रेसर असलेले किरण फलटणकर हे एक अभ्यासु नेते म्हणुन सर्वदुर परिचित आहेत.
सातत्याने विविध आंदोलनाचे माध्यमातुन त्यांनी इगतपुरी शहराचे अनेक प्रश्न चव्हाटयावर मांडले आहे.
तसेच सामाजिक चळवळीचे माध्यमातुन त्यांनी विविध गोर गरिब, अनाथानां मदत केलेली आहे.
फलटणकर हे अत्यंत अभ्यासु नेते म्हणुन ओळखले जातात.
त्यांचे निवडीचे सर्वच स्तरातुन जोरदार स्वागत करणेत आले आहे.

संधीचे सोने करु – फलटणकर
इगतपुरी शहराची सेवा करण्याची संधी नगरसेवक पदाचे रुपातुन मिळाली असुन या संधीचे नक्कीच सोने करु अशी ग्वाही नवनिर्वाचित नगरसेवक किरण फलटणकर यांनी दिली आहे.
