
ओझर: दि.११ वार्ताहर
येथील बोरस्ते विद्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी छत्रपतींच्या संभाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी संभाजी महाराज यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

. याप्रसंगी शिक्षिका संगीता भदाणे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा विद्यालयास भेट दिली. प्रास्ताविक नरेंद्र डेरले यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे मनीषा मोगल अनिता शिरोळे राजश्री टर्ले राजश्री मोहन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले. आभार सोनल माळोदे यांनी मानले.
