
लोहोणेर जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजेंद्र अमृतकार यांनी विद्यालयाला दिलेली ५१हजार रुपयांची देणगी स्वीकारताना मविप्र संचालक विजय पगार समवेत सतिश सोमवंशी, निंबा धामणे, मदन साखरे, मुख्याध्यापिका एस. यू. सागर आणि पर्यवेक्षक आर.एच.देसले.(छाया-:सुनिल एखंडे)*
लोहोणेर-:( प्रतिनिधी )येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाचे सन १९८१-८२ इयत्ता दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी राजेंद्र विश्वनाथ अमृतकार यांच्याकडून विद्यालयाला ५१हजार रुपयांची देणगी देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख म्हणून मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार माझी सरपंच सतीश सोमवंशी,निंबा धामणे रघुनाथ बागुल,मदन साखरे आदींसह मुख्याध्यापिका एस. यू. सागर आणि पर्यवेक्षक आर.एच. देसले व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने राजेंद्र अमृतकार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतरमाजी विद्यार्थी महेंद्र महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करत शाळा म्हणजे ज्ञानाचे संस्कार केंद्र हे संस्कार माणसाला आयुष्यात चांगले कार्य करायला मैलाचा दगड ठरत असतात म्हणूनच ह्या देणगी रूपाने शाळेला दिलेली मदत शाळेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. शेवटी मविप्र देवळा तालुका संचालक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी हे शाळेचे वैभव आहे आणि नेहमीच शाळेच्या विकासात आणि प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा आहे असे मत व्यक्त करत राजेंद्र अमृतकार यांनी दिलेल्या देणगीचा स्वीकार करून त्यांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर सेवकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी महेंद्र महाजन यांनी केले तर राकेश थोरात यांनी आभार आणले. कार्यक्रमयशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.
