
नाशिक ( प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिक मधील सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सल्टिंगसी क्षेत्रातील अग्रगण्य संस्था एकम व्हेन्चर चे एम. डि. साची चिंतावार यांचे तर्फे महिला कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एनराईज बाय सयाजी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संस्थेतील 70 महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

प्रमुख उपस्थितीती मार्गदर्शन
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक आणि धुळे च्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव उपस्थित होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांच्या जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करत कार्पोरेट व राजकारण क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हान केले.
कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नामवंत महिलांची सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती लाभली यामध्ये इंजिनीयर अरुंधती शर्मा, इंजिनियर अद्विता शिंदे, डॉ. नलिनी बागुल, श्रीमती मेघा चिंतावर,

या मान्यवरांनी महिलांना तांत्रिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या अनुभवातून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान सर्व मान्यवरांनी आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातील प्रवासाविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी कार्यालयीन क्षेत्रात काम करताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते तसेच त्या अडचणींवर मात करून यश कसे मिळवता येते याबद्दल त्यांनी आपले अनुभव सांगितले त्यांच्या जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या कथा उपस्थित महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्या भाषणात महिला सक्षमीकरण शिक्षणाचे महत्त्व आणि वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात आत्मविश्वासाची गरज यावर प्रेरणादायी विचार मांडले. महिलांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून नेतृत्व स्वीकारावे आणि जीवनात उत्कृष्ट ते कडे वाटचाल करावी असे त्यांनी आवाहन केले.

मान्यवर अतिथी इंजि. श्रीमती अरुंधती शर्मा इजि. श्रीमती अधिक शिंदे डॉ. श्रीमती नलिनी बागुल आणि श्रीमती मेघा चिंता वार यांनी आपल्या अनुभवात मधून महिलांनी जिद्द सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि एकमेकींना सहकार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमामुळे एकम व्हेन्चर महिलांच्या योगदानाची केवळ ओळखच नाही तर त्यांचा गौरव केला जाईल अशा समावेशक कार्यस्थळाला चालना देण्याच्या आपल्या वचन पद्धतीची पुष्टी केली.
कार्यक्रमाच्या शेवटी एकम व्हेन्चर यांच्या व्यवस्थापना तर्फे उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. तसेच संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या प्रगतीसाठी नेतृत्व विकासासाठी कंपनी नेहमीच पाठिंबा देईल अशी काही देण्यात आली व तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम आणि स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेतला हा महिला दिन कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला या कार्यक्रमामुळे उपस्थित सर्व महिलांना नवचैतन्य आणि आत्मविश्वास मिळाला.
