
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०५ वा दिवस
आपल्याला ऋषी मुनींनी जे शिकविले ती महान तत्वे होती. मात्र आता ऋषी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांची मते देखील पडद्याआड गेली आहेत. आता आपणच स्वतः ऋषी झाले पाहिजे. जे कोणी श्रेष्ठ, महान, थोर पुरुष अवतार होऊन गेलेत, ती सर्व तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसेच होती. केवळ पुस्तकी शिक्षणाने काय साध्य होईल? तासनतास निव्वळ ध्यानधारणेने काय होईल? नुसत्या मंत्र, तंत्र, जप अनुष्ठाने काय साध्य होईल? आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे. आपण स्वतः ती साधना केली पाहिजे. ते महान तत्व, महान ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आपण आत्मनिर्भर झाले पाहिजे. आपण स्वयंपूर्ण झाले पाहिजे.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १९ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. १० मार्च २०२६
★ १८९७ स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजसेविका, “क्रांतीज्योती” सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन
★ १९२९ सुप्रसिध्द मराठी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन
★ १९५९ पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांचा स्मृतीदिन
★ १९७१ कोकणचे गांधी ही उपाधी असलेले सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचा स्मृतिदिन
★ १९९९ मराठी भाषेतील जेष्ठ कवी, नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ “कुसुमाग्रज” यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
