
मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व कुसुमाग्रज यांना अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद.
नांदगाव ( प्रतिनिधी) :– मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांची पुण्यतिथी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतीला यावेळी उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती काळे होत्या. त्यांनी दोन्ही थोर विभूतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या की, “सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजाला प्रकाशाची वाट दाखवली, तर कुसुमाग्रजांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला जागतिक उंचीवर नेऊन ठेवले.या दोन्ही महान व्यक्तींचे विचार आजच्या विद्यार्थी पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहेत.”
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी कवडे यांनी केले.
