
नाशिक : ( प्रतिनिधी ) सिद्दीसाई नगाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल, साकोरा येथे शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी “क्षितिज” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश नारायणे सर व पत्रकार मारुती जगधने दादा उपस्थित होते. तसेच मान्यवरांमध्ये रमेश उग्रसेन बोरसे, घनशाम सुरसे, किरण रमेश बोरसे, ॲड. वंदना पाटील मॅडम, संचालक केतन आहेर व संस्थेच्या अध्यक्षा सरलाताई निकम यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, नाटिका आणि सांस्कृतिक सादरीकरणे करून प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित नाटकाने उपस्थितांची दाद मिळवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज महाले यांनी केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
