
मनमाड ( प्रतिनिधी ) मनमाड शहरातील नामांकित म. वि. प्र. संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महा विद्यालयातील मराठी विभागातील सुमारे 50 पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी क्षेत्र भेट दिली. मराठी ग्रंथ संपदेची ओळख व्हावी, माहिती मिळावी म्हणून महाविद्यालयाच्या मराठी विभाग तर्फे या क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमाच्या मंचावर मनमाड सार्वजनिक वाचनालयचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, माजी अध्यक्ष व कवी प्रदीप गुजराथी, महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे सर संचालक नरेश गुजराथी, सुरेश शिंदे प्रज्ञेश खांदाट महाविद्यालयांच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.विजय पांगुळ,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. पांगुळ यांनी या क्षेत्र भेटी संदर्भात सविस्तर माहिती देत प्रास्ताविक केले

.तर वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी वाचनालयातील उपलब्ध ग्रंथसंपदे संदर्भात माहिती दिली तर सचिव कल्पेश बेदमुथा यांनी वाचनालयचे महत्व व कामकाजा संबंधित अभ्यास पूर्ण माहिती सांगितली तर कवी प्रदीप गुजराथी यांनी आपल्या अनोख्या साहित्य शैलीत विविध कविता सादर करीत मराठी भाषा व वाचक चळवळ या विषयी मनोगत व्यक्त केले यावेळी क्षेत्र भेटी प्रसंगी वाचनालयातील दुर्मिळ संदर्भ ग्रंथ,साहित्यग्रंथ , ललित लेखनग्रंथ , इतिहास, भूगोल, प्रवासवर्णन,शेतीविषयक, शैक्षणिक

ऐतिहासिक,नाटक,कथासंग्रह कादंबरी,क्रीडा,कायदा विषयक आरोग्य,सामाजिक, धार्मिक, मराठी भाषा, विविध विश्वशब्दकोश, चरित्र ग्रंथ,मराठी व्याकरण, निबंध विषयी संबंधित तसेच स्पर्धा परीक्षा विषयी या सह मराठी भाषा संदर्भातील मोठी ग्रंथ संपदा विध्यार्थ्यांना पहाणे साठी व वाचणे साठी उपलब्ध करून देण्यात आली होती महाविद्यालय तील विध्यार्थी नी ह्या ग्रंथ संपदेची माहिती जाणून घेतली यावेळी महाविद्यालयाचे प्रा विजय पांगुळ यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयचे या क्षेत्र भेट साठी आभार प्रगट केले

या प्रकल्प भेट कार्यक्रमला प्रा. काकाळीज मॅडम, प्रा. नितीन गवळी प्रा. संदीप देवडे, प्रा. अंबादास नवले, प्रा. सायली गाढे अक्षय सानप,मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. संध्या गुजराथी,हेमंत मटकर, सौ. नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी सह मराठी विभागतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले
