
अंदरसूल (प्रतिनिधी) येवला तालुक्यातील सर्वात मोठे गाव या गावची परंपरा खिलाडी वृत्तीची अलीकडच्या कालखंडात ही परंपरा खंडित होऊ लागली आहे पूर्वी होळीचा उत्सव चार पाच दिवस साजरा केला जात होता

होळीच्या पूजेनंतर दुसऱ्या दिवशी गावात राहडी येथे होळीच्या राखेत पाणी टाकून गाळवाडी हा उत्सव गावातील अबाल वृद्ध एकत्र येऊन गावातून जिवंत माणसाची अंत्ययात्रा खऱ्या अंत्ययात्रेसाखी मिरवणूक काढली जात असे नंतर सतत वाहतअसलेल्या कोळ गंगा नदीत मनमुराद पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत असे त्यानंतर दोन तीन दिवस अबालवृद्ध टिपरीखेळ टिप्परघाई हा खेळ खेळला जात असे रंगपंचमी गावातून बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मध्ये रंगाचे टिप भरून मिरवणूक काढून रंगाची उधळण केली जात असे

मात्र कालांतराने खिलाडी वृत्तीचा अभाव मद्दपींचा सुळसुळाट या मुळे परंपरा खंडित झाली चिमुकले व तरुणाईचा उत्साह मात्र टिकून दिसतो
