
अंदरसुल ( प्रतिनिधी ) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय येवला शाखा पटेल कॉलनी येथील सेवाकेंद्रात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एस एन डी इंजिनिअरिंग अँड रिसर्च सेंटरच्या प्रिन्सिपल सौ.गिरजा बोंबले मॅम, सौ पूजा गाडे मॅडम,सौ. पल्लवी गाडे मॅडम,सौ. सुनिता धनवटे मॅडम लाभल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महिला दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले.याप्रसंगी ब्रह्माकुमारी येवला सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीता दीदी यांनी महिला या गुणांची खाण आहेत, संस्कारांचा शृंगार आपल्यावर यथार्थ शोभतो, एक नारी सब पर भारी, इतिहासातील अनेक दिग्गज महिला,त्यांचे चरित्र, वर्तमान काळात महिलेचा समाजात असलेला वावर, आणि उद्याची स्त्री कशी असेल यावर विशेष मार्गदर्शन केले, जगातली सर्वात मोठी महिलांकडून प्रशाशीत केली जाणारी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची विशेषता व यात कार्य करणाऱ्या महिलांचा नामउल्लेख करण्यात आला.
राजयोगीनी ब्रह्माकुमारी अनुदिदी यांनी संस्थेचा परिचय तसेच आलेल्या सर्व महिलांचा तिलक, पुष्पगुच्छ शाल व प्रसाद देऊन सन्मान केला. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सौ गिरजा बोंबले मॅडम यांनी समाजातील स्त्रीचे महत्व विशद केले, या ईश्वरीय विश्वविद्यालयात रोज मेडिटेशन करण्यासाठी व ज्ञान घेण्यासाठी येत असणाऱ्या सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजयोगाचा सात दिवसाचा साप्ताहिक पाठ्यक्रम कोर्स करण्यासाठी देखील त्यांनी संकल्प केला.
सर्व महिलांनी महिला दिन साजरा झाल्यानंतर रंगोत्सवाचा देखील आनंद घेतला. या प्रसंगी रेखा लाड, द्वारका देशमुख, सुशीला गाडे,
रूपाली भांडगे, मीरा भांडगे, प्रमिला शहारे, रूपाली नागपुरे,विमल भुले,रजनी नागपुरे, कल्पना नीकुंभ, राजश्री राजगुरू, कलाना कोटमे,तारा गंभीर, प्रमिला मढवई, भीमा मढवई, अंजना शेळके, उषा बोर्डे, संगीता आहेर, सविता निर्भवणे, आदिती मढवई, विद्या छतानी,संध्या छतानी, सुमन जाधव, वंदना पवार या महिला उपस्थित होत्या.
