
नांदगाव (प्रतिनिधी)डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती नांदगाव नगरपालिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन नांदगाव शहरांमध्ये करण्यात आलेले आहे 5 एप्रिल रोजी आशिया खंडाचे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या2329 व्या जयंतीनिमित्त सारनाथ बौद्ध विहार येथे अशोक जयंती साजरी करून संगीत खुर्चीचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाला शहरातील महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला नाना जाधव ,अविनाश केदारे विश्वास भाऊ आहिरे ,खेडकर बाबुजी ,राजू भाऊ गांगुर्डे, राजू भाऊ लाठे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळेस उत्सव समितीच्या सदस्य अलकाताई रुपवते यांनी सम्राट अशोक बद्दल माहिती दिली कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अरुण भाऊ साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन निकम एडवोकेट सचिन साळवे जयंती उत्सव समितीच्या कार्याध्यक्ष ॳॅड. विद्या कसबे,बिजला गंगावणे, निर्मला ताई केदारे ,सुनिता देहाडे, छायाताई जाधव, वंदना पांडे ,विजया चतुर, जयाताई जगताप,उषा राठोड, हेमा राठोड, आशाताई पाटील माया आहिरे, करिष्मा कसबे शबाना मंसूरी, नयना खटके, मनीषा जगताप,तबसुन शेख, अंजली काळे आदी महिला उपस्थित होत्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक अलका ताई रुपवते तर द्वितीय क्रमांक प्रमिलाताई काळे यांचा आला.

