
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०४ वा दिवस
सारी परिस्थिती अनुकूल असतांना मोठे पद मिळाल्यावर तर कोणीही मोठा होऊ शकतो! एखादा भित्रा मनुष्य देखील रंगमंचाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रकाशात वीर बनतो. जग सारखे बघत आहे मग कुणाचे हृदय स्पंदित होणार नाही? आपले कार्य शक्य तितक्या चांगल्या रीतीने करेपर्यंत कुणाची नाडी जोराने चालणार नाही? पण मला खरा थोरपणा तर त्या किड्यातच दिसत आहे की जो आपले कर्तव्य प्रतिक्षणी शांतपणे, निश्चयपूर्वक पार पाडीत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जो संयमाने, निष्ठेने, नियमितपणे, सातत्यपूर्णपणे कार्य करतो व स्वतःचे नेतृत्व सिध्द करतो. तोच खरा नायक ठरतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १८ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ९ मार्च २०२६
★ १८६३ गायक, नट, नाटककार “समाजराव” लक्ष्मण बापूजी कोल्हटकर यांचा जन्मदिन
★ १९३० संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. युसूफखान महंमद तथा यु. म. पठाण यांचा जन्मदिन
★ १९३१ काश्मीर राजघराण्याचे वंशज माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते डॉ. करणसिंग यांचा जन्मदिन.
★ १९५६ संयुक्त राष्ट्र संघटनेचे उच्चायुक्त, सुप्रसिध्द लेखक, स्तंभलेखाकार, अर्थतज्ञ, खासदार केंद्रीय मंत्री, काँग्रेस नेते शशी थरूर यांचा जन्मदिन.
