
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त दीपप्रज्वलन करताना मा प्राचार्य, मा सरपंच श्रीम सुवर्णा शिंदे डॉ रोहिणी घुगे, समवेत उपमुख्याध्यापिका , पर्यवेक्षक सोमनाथ पगार व शिक्षकवृंद.
सायखेडा-:( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात प्राचार्य श्री रामदास वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती प्रतिमा पूजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री रामदास वाजे हे होते. तर सायखेडा गावच्या सरपंच मा. सौ सुवर्णा शिंदे, डॉ. रोहिणी घुगे, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ. वंदना कर्डक, माता पालक संघांच्या सहसचिव राखी सिकची,उपमुख्याध्यापिका श्रीम अलका अहिरे ,पर्यवेक्षक सोमनाथ पगार अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम, ज्यूनिअर कॉलेजच्या श्रीमती साळवे मॅडमआदींसह महिला शिक्षिका सेविका व्यासपीठावर उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त उपस्थित सर्व महिलांचा गुलाबपुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयातील उपशिक्षिका आगळे मॅडम यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक मनोगत श्री पंकज गांगुर्डे यांनी व्यक्त केले .डॉ सौ. रोहिणी घुगे यांनी महिला कशा पद्धतीने आज पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात काम करत आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे हे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री वाजे सर यांनी सर्व महिला भगिनींचा आपण सन्मान करावा व तो फक्त महिलादिनाला न करता कायमच करावा असे प्रतिपादन केले व सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ८ मार्च रोजीच जागतिक महिला दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली.

इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जीवनात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिक्षा शिंदे यांनी केले व आभारप्रदर्शन श्रीमती वैशाली शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
