
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे दिनी मौजे विराथन खुर्द, सफाळे येथील सरपंच सौ. राजश्री सदानंद किणी व त्यांचे सहकारी सदस्य यांच्या सौजन्याने बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ग्रामपंचायत विराथन खुर्द,सफाळे येथील गावाच्या वेशीवरील प्रवेशद्वाराचे उदघाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती श्री सुरेश तरे यांच्या सह पंचक्रोशीतील ग्रामपंचायत माकणे, मांडे – विठ्ठलवाडी, विराथन बुद्रुक, जलसार, टेमभीखोडावे, वेढी, नगावे, माकूनसार या गावचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, मायखोप गावातील समाजिक कार्येकर्ते श्री.दत्तात्रये भोईर उपस्थित होते.
प्रवेशद्वारापासून ते जुन्या गावा पर्यंत शिवजयंती निमित्त वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सदर कार्यक्रमात गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एका छोट्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिवरायांच्या नावाने बांधण्यात आलेल्या ह्या भव्यदिव्य आणि शिवकालीन वास्तूंची आठवण करून देणाऱ्या आकर्षक प्रवेशद्वाराच्या उभारणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सरपंच सौ राजश्री सदानंद किणी यांचे विशेष कौतुक होत आहे.
