
लेखक:- डॉ.गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडिकल ॴॅफिसर ,स्वामी विवेकानंद नगर,येवला रोड, नांदगाव जि.नाशिक

॥आत्मा मालिक॥गुरु ओम् गुरु ओम्॥ हरिपाठ चिंतन अभंग-११ “हरि उच्चारणी अनंत पापराशी। जातील लयासी क्षणमात्रे॥१॥ तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि॥२॥ हरि उच्चारण मंत्र पै अगाध। पळे भूतबाधा भये याचे॥३॥ ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा॥४॥
हरिनामाचा उच्चार केल्याने अनंत पापांच्या राशी एका क्षणार्धात नष्ट होतात, हा विचार समजणे इतके सोपे नाही। जर नामजपाने लगेच पापे जळत असतील तर कोणीही पापे करील व नंतर नामजप करुन ते पाप नष्ट करुन घेईल। हे इतके सोपे नाही।
पाप म्हणजे शास्राच्या विरुध्द कर्मे करणे। पूर्वजन्मातील या सर्व शुभाशुभ कर्मांचा संचय म्हणजेच दैव। “पूर्वजन्मकृतं कर्मं तद्दैवमिति कथ्यते।” व्यासांनी पाप व पुण्य याची व्याख्या केली,” अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयं। परोपकार: पुण्याय, पापाय परपीडनम्॥१॥” १८ पुराणांचा सार व्यासांनी २ च शब्दात सांगीतला। परोपकार, ज्या प्रक्रियेने दुसर्याचे हित होईल, दुसर्याला सुख मिळेल त्याला “पुण्य” व ज्या कर्माने दुसर्याला पीडा, दु:ख होते त्याला “पाप” म्हणतात।
कर्म ३ प्रकारचे आहेत। (१) संचित (२) क्रियमाण (३) भोग म्हणजे प्रारब्ध। (१)-संचित म्हणजे नुसत्या याच जन्मातले नाही तर आता पर्यंत च्या अनेक पूर्व जन्मात जे जे कर्म केले ते सर्व। त्या सर्व पूर्व कर्मांचा संचय, साठा। (२) प्रारब्ध आपण सर्वच संचीत कर्म एका जन्मात भोगू शकत नाही, कारण तो अनेक जन्मांच्या कर्मांचा साठा आहे. या जन्मात ज्या कर्मांना भोगण्या ची सुरुवात [आरंभ] झाली आहे त्यांना प्रारब्ध कर्म म्हणतात. ज्या कर्मांचे फळ आपण भोगतो आहे ते। (३) क्रियमाण- आता आपण जे कर्म करतो आहे, ते क्रियमाण कर्म. यात आपण निवड करु शकतो, कसे कर्म करायचे, चांगले की, वाईट. -वेदांत मे कर्म के ३ प्रकार बताये गये है। (१) प्रारब्ध-हमारे पूर्व कर्म है, जिसके फल को हम इस क्षण भुगत रहे है। (२) संचित कर्म वे है, जो किसी भांडार घर में संचित होकर प्रसुप्त होकर पडे हैं और भविष्य मे प्रकट होने मे अपनी बारी का इंतजार करते है। प्रारब्ध पर हमारा कोई अधिकार नहीं। क्रियमाण अब भी हमारे हाथ मे है। संचित को प्रयत्न द्वारा नष्ट किया जाता है। संचित कर्म हमारी मध्यमा नाडी सुषुम्णा में संचित पूर्वजन्म के कर्मोंके संस्कार है। “प्रारब्धं भोगतो नश्येत्, संचितं हन्ति दीक्षया।“ (आश्रम पत्रिका नोव्हें-७७, पे-२०१) संचिताचे, प्रारब्धाचे फळ- यद्व्यंगा: कुष्ठिनश्चांधा: पंगवश्च दरिद्रिण:। पूर्वार्जीत पापस्य फलमश्नंति देहिन:॥ वैद्यकीय सुभाषित॥ जे व्यंग असलेले, जन्मताच आंधळे, पांगळे, कोड कुष्ठरोगी, दरिद्री असतात ते आपल्याच पूर्व जन्मीची केलेल्या पाप कर्माची फळे भोगत असतात। दारिद्र्यदु:खरोगाश्च, बंधनव्यसनानि च। आत्मापराधवृक्षस्य फलान्येतानि देहिनाम्॥५४॥कुलार्णवतंत्र-२८॥ दारिद्र्य, दु:ख, आजारपण, रोग, संकटे, बंधने ही सर्व आत्मापराध म्हणजे मनुष्याच्या
आपल्याच पूर्व कर्माची फळे आहेत.
यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् | तथा पूर्वकॄतं कर्म कर्तारमनुगच्छति.. जसे हजारो गायींच्या कळपातून गायीचे वासरु आपल्या आई कडेच जाते, तसेच मनुष्याचे पूर्वकर्म त्याच्या कडे च जाते. -अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभं। ना भुक्तं क्षीयते कर्म कल्पकोटिशतैरपि। अर्थात् अपने किए हुये अच्छे-बुरे कर्म अवश्य भुगतने पडते है। बिना भुगते सौ करोड कल्पों के बाद भी उन कर्मों का नाश नहीं होता।(पक-१२) बाबा मुक्तानंद [परमार्थ कथा प्रसंग]
तृण अग्निमेळे समरस झाले। तैसे नामे केले जपता हरि॥२॥ अग्नीच्या संगतीत गवत आले की ते जळून अग्नीशी समरस होते, तसे नामजपाने पातके जळुन जातात। याच विषयाला धरुन भगवद् गीतेतील हा श्लोक आहे, जेव्हा सद्गुरुकृपेने अंतर्शक्ती कुंडलिनी जागृत होते तेव्हा प्रगट होणार्या ज्ञानरुपी अग्नीत सर्व कर्मे, जन्मोजन्मीची पातके जळून भस्म होतात।
यथैधांसि समिध्दोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन। ज्ञानाग्नि: सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा॥ भगवद् गीता॥४-३७॥ हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्ठांना (लाकडांना) भस्म करुन टाकतो, तसाच ज्ञानरुपी अग्नी सर्व कर्मांना भस्मसात् करतो। ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा॥४॥ “तुटे भवरोग। संचीत क्रियमाण भोग॥१॥ ऐसे विठोबाचे नाम। ऊच्चारिता खंडे जन्म॥२॥ वसो न सके पाप। जाय त्रिविध तो ताप॥३॥ तुका म्हणे माया। होय दासी लागे पाया॥४॥[३४४] ॥तुकाराम गाथा॥“
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझा हरि (देव) इतका समर्थ आहे, की त्याचे वर्णन वेद उपनिषदे सुध्दा करु शकत नाहीत। ईश्वराला सर्व काही शक्य आहे। कारण सृष्टी चा एकमेव (सर्व) कर्ता ईश्वरच आहे।
[04-01-2023]
