
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०३ वा दिवस
*'कन्याप्येव पालनीया शिक्षणीया अतियत्नतः'* कन्येचेही अतिशय काळजीपूर्वक संगोपन करावे व तिला प्रयत्नपूर्वक शिक्षण द्यावे, असे ज्या देशाची संस्कृती सांगते, त्यांचा वारसा सांगणारे तुम्ही आपल्या मुलींना घरात कोंडून ठेवता, अकराव्या वर्षी लग्न करणारे तुम्ही माणसे म्हणवून घ्यायला लायक आहात का? मुलींना शिक्षण द्या, तेही असे की ज्यातून चारित्र्य घडेल, मनाची शक्ती वाढेल, बुद्धीचा विकास होईल आणि स्वावलंबी बनता येईल, असे शिक्षण दिले तर स्त्रियांचे प्रश्न त्या स्वतःच सोडवतील. त्यांच्या अंगी थोडे वीरत्व येण्याची गरज आहे. इतर देशातील स्त्रियांप्रमाणेच भारतीय स्त्रियाही उन्नती करण्यास समर्थ आहेत. तुम्ही फक्त त्यांना शिक्षण द्या व त्यांच्या वाटेतून बाजूला व्हा त्यांना योग्य अशा सुधारणा कोणत्या हे त्याच ठरवतील!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १७ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ८ मार्च २०२६
★ रंगपंचमी
★१९३० सुप्रसिद्ध साहित्यिक चिंतामण त्र्यंबक खानोलकर उर्फ “आरती प्रभू” यांचा जन्मदिन
★ १९७५ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन.
★ महिला दिनानिमित्त सर्व मातृशक्तींना वंदन व हार्दिक शुभेच्छा.
★ रंगात रंग मिसळले की, आणखी नव्या छटा निर्माण होतात. माणसांनी माणसात मिसळले की, छान नाती तयार होतात. चला तर मग, रंग आणि नाती अधिक काळ टिकविण्यासाठी रंगोत्सव साजरा करूया.
रंगपंचमीच्या आपणास व परिवारास शुभेच्छा.
🔴🟠🔵🟡🟢🟣🟤🔴🟠🔵
