
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन –
उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने मंडळाच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि १५ मार्च रोजी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित धनलक्ष्मी प्राथमिक व माध्यमिक शाळा मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा नाशिक येथे लोकवर्गणीतून एक दिवसीय राज्यस्तरीय तेविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन शंकर बो-हाडे व्यासपीठावर रंगणार आहे.
पहिल्या सत्रात सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध लेखक, कवी राजा (रवी) ठाकुर यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खानदेशातील सुप्रसिद्ध लेखक प्रा डाॅ प्रभाकर जोशी (अमळनेर ) हे भूषवणार असून समारोपीय सत्राचे अध्यक्षपद साप्ताहिक नगाराचे संपादक सुप्रसिद्ध लेखक डाॅ विनोद गोरवाडकर हे भूषवतील तर ज्येष्ठ पत्रकार सावळीराम तिदमे हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी बी जी वाघ (नाशिक)
विसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष ,
प्रा डाॅ संजीव गिरासे (धुळे),बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष, प्रा सुमनताई मुठे (नाशिक),उद्घाटक बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन ,डाॅ प्रकाश कोल्हे (नाशिक),अध्यक्ष मानवधन शैक्षणिक संस्था,
ॲड मोहन शुक्ला (एरंडोल) स्वागताध्यक्ष तिसरे अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन, कविश्री देविदास खडताळे ( नाशिक),लेखक प्रा डाॅ सतीश मस्के (पिंपळनेर जि धुळे) हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात दुसरे सत्रात थोरांच्या स्मृती जागवणारा जागवू या स्मृती हे सत्र
लेखिका श्रीमती माधुरी चौधरी (छत्रपती संभाजीनगर) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्रात किरण भावसार (सिन्नर)- नारायण सुर्वे , सप्तर्षी माळी (नाशिक)- मारूती चित्तमपल्ली , रमेश वाघ (नाशिक )- शंकर बो-हाडे हे सहभागी होतील.
तिसरे सत्रा अंतर्गत कथा कादंबरीकार
ॲड विलास मोरे (एरंडोल ) यांचे कथाकथन होईल.
चौथे सत्राअंतर्गत कविसंमेलन एश्र्वर्य पाटेकर (नाशिक) साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या वेळी कवयित्री श्रीमती शोभा बडवे (मालेगाव) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
पाचवे सत्रात संमेलनाचा समारोप डाॅ विनोद गोरवाडकर (मालेगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या सत्रात सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार रामदास नागवंशी (नाशिक),सूर्योदय काव्यरत्न पुरस्कार अविनाश पोईनकर (चंद्रपुर) यांच्या दंडकारूण्य या काव्यसंग्रहाला
सूर्योदय गिरिजा कीर कथा पुरस्कार वडगाव चंद्रपुर येथील गोपाल शिरपूरकर (वडगाव चंद्रपुर) यांच्या भुईकोर या कथासंग्रहाला देऊन गौरवण्यात येणार आहे.
संमेलनाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन संजय आहेर हे करणार आहेत.
साहित्य संमेलनात प्रवेश खुला असून जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी साहित्य संमेलनास उपस्थित राहवे असे आवाहन स्वागताध्यक्ष सावळीराम तिदमे, सूर्योदय चे अध्यक्ष सतीश जैन, शहराध्यक्ष साहेबराव पाटील, सचिव डी बी महाजन कु गायत्री पाटील, उपाध्यक्ष विनोद निळे व नाशिक येथील स्नेही परिवार यांनी केले आहे.
