
नाशिक ( प्रतिनिधी )श्रीमान टी .जे . चौहान (बिटको )विद्यालय मोरवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यानिमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून महिला दक्षता विभागाच्या पोलीस निरीक्षक सौ आम्रपाली तायडे उपस्थित होत्या .त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम या विषयावर अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले .विद्यालयातर्फे कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . श्रद्धा जाधव हिने तर पाहुण्यांचा परिचय कु . अनुजा डोमाडे हिने केला .याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ उज्वला माळी तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
