
नांदगाव 🙁 प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नांदगाव येथे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.एच.बी ठाकरे अध्यक्षस्थानी होते . त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जागतिक महिला दिन 1911 पासून साजरा केला जातो, जेव्हा महिलांनी मतदानाचा अधिकार, समान कामासाठी, समान वेतन, आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या परिस्थितीसाठी लंडनमध्ये आंदोलन केले होते.
आज हा दिवस महिलांच्या अधिकारांना समर्थन देण्यासाठी आणि समानता, न्याय, आणि शांतीसाठी हा दिवस साजरा केला जातो.
त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल शाखेच्या मुख्याध्यापिका श्रीमती . काळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर होरायझन अकॅडमी नांदगावच्या मुख्याध्यापिका श्रीमती.मढे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्यानंतर औ. प्र. संस्थेतील निदेशिका श्रीमती भड मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की स्री ही एक माता असते तर कुणाची बहीण असते तसेच त्यांनी आपल्या मनोगतातून एक शिव कालीन प्रसंग सांगितला त्यात रायगडावरील हिरकणी बुरुज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माता हिरकणीच्या अद्वितीय धाडसाचे व मातृप्रेमाचे प्रतीक आहे. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतरही, आपल्या तान्हुल्या बाळासाठी हिरा नावाची दूधवाली कडा उतरून खाली गेली. या साहसाचे कौतुक करून महाराजांनी तिथे एक भक्कम बुरुज उभारला. जो आजही रायगडावर पाहायला मिळतो असे उत्तम मार्गदर्शन केले.
तसेच वसंतराव पवार बाह्य रुग्णालय नांदगाव येथील श्रीमती पगार मॅडम,
कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यानंतर सर्व महिलाचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमा प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगावचे प्राचार्य एच.बी.ठाकरे, गटनिदेशक श्री. एस.जे. ठाकरे एच.बी.सोनस,आर .एस. बोराळे,डी.डी.काकळीज,डी.एस.अमराळे, के. डी.आहेर, जे.के.बोरसे,व्ही. एस. बोरसे इ.निदेशक , शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री डी .डी.काकळीज यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. भड मॅडम यांनी केले.
