
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०२ वा दिवस
लहानपणापासूनच करुणात्मक, बलदायक, विधायक, रचनात्मक असे उपयुक्त विचार त्यांच्या मेंदूत शिरू द्या. असल्याच विचारांचा प्रभाव स्वतःवरही पडू द्या. दुबळेपणा आणतील, पंगू बनवतील अशा विचारांना थारासुद्धा देऊ नका. दृढपणे सदा आपल्याशी म्हणा - "मी तोच आहे, मी तोच आहे - मी आत्मा आहे." तुमच्या हृदयात हेच एखाद्या संगीतासारखे अहर्निश झंकृत होत राहो. अगदी मृत्यूसमयी देखील 'सोऽहं' 'सोऽहं' असा घोष करीतच प्रयाण करा. हेच सत्य आहे की हे जग चालविणारी महाशक्ती तुमच्या ठायी आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १६ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ७ मार्च २०२६
★ १६४९ छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन.
★ १९६१ भारताचे दुसरे गृहमंत्री, भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा स्मृतीदिन.
