
लेखन- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
कै.त्रंबकराव, कै. भगवंतराव पाटिल वारुंगसे ही एकेकाळी जिल्हाभर नावाजलेली, गाजलेली माणसं. या समर्थ घराण्याचां वारसा ग.भा. सिताबाई त्रंबकराव पाटिल वारुंगसे यांनी समर्थपणे चालवला. कर्तृत्वान पतीचे घर, संसार समर्थपणे सांभाळतानांच लेकरावरही अपार माया व सुसंस्कार करत त्यांना घडवण्याचे काम या मातेने केले.
त्यांचे वर्षभरापुर्वी निधन झाले असुन शनिवार दि. ७ मार्च रोजी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने या मातेच्या ममत्वाचा घेतलेला हा आढावा.
ईगतपुरी तालुक्यातील बेलगाव तर्हाळे हे प्रथम पासुनच प्रसिद्द असलेले गाव.
या गावातील कै. त्रंबकराव व कै. भंगवतराव या भावाचें कर्तृत्व नावाजलेले.
ज्या काळात शिक्षणाबाबत पराकोटीची उदासिनता होती, त्या काळात उत्तम शिक्षण घेऊन या भावानीं बांधकाम क्षेत्रात कॉन्ट्रॅक्टर म्हणुन कमालीचे नाव कमवले.
याच बरोबर राजकिय क्षेत्रातही ते कार्यरत होते.
वडिल व चुलते यांचा हाच आदर्श डोळयासमोर ठेवत कै.त्रंबकराव पाटिल यांची तीनही मुले व दोन्ही मुली कर्तबगार जन्मल्या.
या मुलांवर उत्तम संस्कार करण्याचे काम मातोश्री सिताबाई यांनी केले.
त्यांचा जेष्ठ मुलगा पांडुरंग मामा वारुंगसे हे राजकिय क्षेत्रात भरिव काम करत आहे.प्रारंभी पत्रकार म्हणुन दै. गावकरीत काम करणार्या पांडुरंग मामा नीं राजकिय क्षेत्रात ही ठसा उमटवला आहे.
ईगतपुरी तालुका पत्रकार संघ अध्यक्ष पदासह बेलगाव येथील उपसरपंच पद, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पद,ईगतपुरी पंचायत समिती सदस्य, उपसभापती पद अशी पदे भुषवली आहेत.
आज ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ईगतपुरी तालुका अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे. व त्यांचे नेतृत्वाखाली ईगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघ व सिन्नर मतदार संघ येथुन पक्षाचे दोन्ही उमेदवार अनुक्रमे हिरामण खोसकर व माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवडुन आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांचे दुसरे चिरंजीव विष्णु पाटिल हे शासकिय सेवेत कार्यरत आहेत. ते लेखा परिक्षण विभागात लेखा परिक्षक म्हणुन काम करत आहे. याच बरोबर शासकिय आधिकारी यांनी एकत्र येत सामाजिक विकासासाठी स्थापन केलेल्या प्रेरणा एकता या सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष म्हणुन काम करत आहेत. या माध्यमातुन समाजासाठी त्यांनी विविध कार्य केले आहेत.
तसेच ते ईगतपुरी तालुका समाज विकास फाऊंडेशन चे तालुका सचिव ही आहेत.
कनिष्ठ चिरंजीव भरत हा प्रगतशील शेतकरी म्हणुन घरची शेती सांभाळतो आहे. भरतची पत्नी सौ.प्रमिला ही बेलगाव ची उपसरपंच आहे.
मातोश्री सिताबाई यांच्या लेकीनींही राजकिय क्षेत्रात नाव कमावले असुन सौ. सुशिला या खेडभैरव तर सौ.आशाबाई या बेलु च्या सरपंच म्हणुन कार्यरत आहेत.
आईचे वारकरी संप्रदायाचे संस्कार सर्वच मुलांवर असुन अध्यात्म क्षेत्रातही ही मुले पारंगत आहे.
तीन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा गोकुळभरला संसार आपल्या डोळयानीं पहात कृतार्थ भावनेने या मातेने गतवर्षी आपला देह ठेवला.
प्रथम पुण्यस्मरणाचे निमित्ताने या मातोश्री स विनम्र अभिवादन.
लेखन- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
