
मुंबई ( प्रतिनिधी)महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या प्रलंबित समस्येबाबत बीड, धाराशिव,लातूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार मा.श्री सुरेश आण्णा धस साहेब यांच्या सोबत आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी मंत्रालय मुंबई,येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीपासून विविध कल्याणकारी योजना महामंडळ स्तरावर प्रलंबित असलेल्या सहानुग्र अनुदानाबाबत आणि मागील आढावा बैठकीत योजनेला मंजुरी दिल्याप्रमाणे योजना निहाय शासन निर्णय संदर्भात विस्तृत चर्चा झाली. येणाऱ्या काहीं दिवसात संबंधित अधिकारी यांची बैठक होणार!
तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव मा.हर्षदीपजी कांबळे साहेब, सहसचिव वर्षाची देशमुख मॅडम, लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा सह सचिव मा.रविंद्रजी गोरवे, सह सचिव मा.श्री बागुल साहेब, ऊसतोड महामंडळाच्या विभागाचे कक्ष अधिकारी मा. श्री बामणे साहेब यांच्याशी संघटनेच्या माध्यमातून वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बैठकीत देण्यात आलेल्या मंजुरी प्रमाणे शासन निर्णय पारित करून 10 लाखाचे सरसकट अनुदान, ईतर योजनेबाबत चर्चा झाली. सुरेश पवार
