
इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन,मुंबई (IDF) या सामाजिक संस्थेचा माध्यमातून जव्हार तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील पंचायत समिती जव्हार अंतर्गत असलेल्या ५ केंद्रातील ५९ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता १ली ते १०वी मध्ये शिकत असलेल्या सुमारे ३०११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्याचा कार्यक्रम दिनांक २८फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाला.

आदिवासी बहुल भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिने हा महत्व पूर्ण उपक्रम राबविण्यात आला असून ही संस्था गेल्या ४० वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर काम करणारी शैक्षणिक सामाजिक संस्था आहे.२०१४पासून शैक्षणिक क्षेत्रात करत असून गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी “आशाऐ” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट चा पुरवठ्यात करते.

प्रत्येक इयत्ता निहाय विद्यार्थ्यांना आवश्यक वह्या , बॅग, पेन, शार्पनर, पेन्सिल, रंग,चित्रकला वही, कंपास, खोडरबर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले . केंद्र बेहडपाडा, पवारपाडा पिंपळशेत,मेढा, कोरतड या ५ ही केंद्रातील विद्यार्थ्यासाठी हा बहुपयोगी कार्यक्रम घेण्यात आला , या संस्थेमार्फत या अगोदर ही जव्हार तालुक्यातील ७केंद्रातील ५००० विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम माहे डिसेंबर २०२५रोजी घेण्यात आला होता.

या प्रसंगी इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशन चे श्री अनिश पलीवाल सर , श्री शशांक शेट्टी सर, श्री मॉन्टी महाराणा सर , यांची उपस्थित लाभली.यासाठी रामनारायण कॉलेज दहिसर येथील NSS विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.सर्व केंद्राचे केंद्र समन्वयक ,सर्व शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले.

भविष्यातही जव्हार तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण जास्तीत जास्त सहकार्य करण्याचा मनोदय संस्थेचे सचिव श्री शशांक सर यांनी व्यक्त केला.जव्हार तालुक्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच झाला आहे.यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद व नवचैतन्य दिसत होते. सर्व संस्थेचे कार्यकर्ते यांनी होळी सणानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या सोबत रंगोत्सव साजरा करून विद्यार्थ्याचा आनंद द्विगुणित केला.
