
नाशिक (प्रतिनिधी) दि. २६ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ दरम्यान चार दिवसीय चौथे विश्व मराठी संमेलन मोठ्या दिमाखात विविध वेगवेगळ्या सभागृहात विशिष्ट कार्यक्रमांनी साजरे झाले. नृत्य, कलाविष्कार, गायन, वादन, नाट्य, व्याख्याने, चर्चासत्र, कवि संमेलन यांनी चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन गजबजले.
या चौथ्या विश्व मराठी संमेलनात नव्या जुन्या कवींचे कवी संमेलन १ मार्च रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत घेण्यात आले. कविवर्य अरुण म्हात्रे, प्रकाश होळकर, किशोर कदम, प्रशांत मोरे आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या. कवी संजय निकम यांनी परिवर्तन, इंद्रायणी, पाण्यात नभ, मराठी, गोदाकाठ या कविता सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सदाबहार कवितांनी वाहवा मिळवली. चौथ्या विश्व मराठी संमेलनात मालेगावच्या संजय निकम यांच्या कवितांचाही बोलबाला झाला. आणि चौथे विश्व मराठी संमेलन थाटामाटात संपन्न झाले.
