
लेखन- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
माणिकखांब, ता. ईगतपुरी येथील प्रगतशील शेतकरी, राजकिय , सामाजिक व धार्मिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे कै. लालु पाटिल आडोळे यांचे नुकतेच निधन झाले आहे.
भरदार पैलवानी शरिरयष्टी, त्याला साजेशी उंची, पिळदार मिशा आणि पाहताक्षणीच दरारा व छाप पडावी असे व्यक्तिमत्व लालु पाटलाचें होते.
राजकिय जीवनात कै.लोकनेते गोपाळराव गुळवे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे कै. लालु पाटिल यांनी माणिकखांब गावचे सरपंच पद भुषवुन गावचे समर्थ नेतृत्व केले होते.
सहकार क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला होता.ते माणिकखांब गावचे सहकारी सोसायटीचे चेअरमन ही होते.तसेच गावातील भैरवनाथ मंदिराचे ट्रस्ट चे अध्यक्ष ही होते.
राजकिय, सामाजिक,धार्मिक व सहकार क्षेत्रात काम करतानांच त्यांनी शेतीही उत्तम केली. तसेच मुलांवर योग्य ते संस्कार करुन त्यांना सन्मार्गी ही लावले.
त्यांची सगळी मुले त्यांच्याप्रमाणेच माळकरी व सुसंस्कारीत आहेत.
मणिलाल आडोळे हे आहुर्ली येथील कनिष्ठ माध्यमिक विदयालयात प्राध्यापक आहेत. सगळयात धाकटा मुलगा कैलास हे घोटी शहरात कापड व्यावसायिक आहेत. तर सगळयात मोठा मुलगा कृष्णा हा शेती सांभाळतो आहे.
कै.लालु पाटिल यांनी परिवारास उत्तम संस्कार दिले आहेत. तीन मुली सौ. प्रमिलाबाई, सौ.आशाबाई व सौ. चंद्रकलाबाई असुन त्या सुस्थळी दिल्या आहेत.
पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, जावई व गोजिरवाणी नातवंडे असा गोकुळभरला त्यांचा संसार होता.
आता ते या नश्वर देहाचा त्याग करुन परमेश्वराचे घरी गेले आहेत. पाठिमागे आपल्या आदर्श वागण्याचा संस्कार ते घरादारास व समाजास ही देऊन गेले आहेत.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही ईशचरणी प्रार्थना व कै. लालु पाटिल आडोळे यांना विनम्र अभिवादन.
लेखन- नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
