
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९९ वा दिवस
एखादा माणूस जर सतत वाईट शब्द ऐकत असेल, वाईट विचार करीत असेल, वाईट कर्म करीत असेल, सतत वाईट कर्म पाहत असेल तर त्याचे मन वाईट संस्कारांनी भरून जाईल आणि त्याला काही माहिती होण्याआधीच त्याचे हे वाईट संस्कार त्याच्या विचारावर आणि कामावर आपला प्रभाव टाकतील. खरं पाहता हे वाईट संस्कार सतत आपले काम करीत राहतात. वाईट संस्कार संपन्न असल्यामुळे अशा व्यक्तीची कामेही वाईट असतात. या संस्कारांमध्ये समाविष्ट असलेली वाईट काम करण्याची प्रबळ शक्ती त्याच्यात सतत निर्माण होतील अशा संस्कारांच्या हातातील तो एक बाहुले होतो. त्यामुळे वाईट काम करण्यासाठी ते संस्कार त्याला शक्तीने भाग पाडत असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १३ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ४ मार्च २०२६
★ वसंतोत्सवारंभ
★ १९५१ नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
★ २०११ केंद्रीय मानव संसाधन मंत्री, तीनवेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल काँग्रेस नेते अर्जुन सिंग यांचा स्मृतीदिन.
★ राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह.
