
मोहाडी: (बातमीदार) कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात जयंतीनिमित्त “मविप्र” चे माजी संचालक कर्मवीर एकनाथ भाऊ जाधव यांना अभिवादन करण्यात आले.विलासजी देशमुख मविप्र शिक्षणाधिकारी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मंचावर संचालक प्रवीण नाना जाधव. सुरेश सोमवंशी अध्यक्ष माध्यमिक शालेय समिती. रावराव पाटील अध्यक्ष अभिनव शालेय समिती. विश्वस्त अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदिर मोहाडी उत्तम काका जाधव. पत्रकार उत्तम जाधव. विजय जाधव. डॉ. चंद्रकांत पाटील. जेष्ठशिक्षक प्रदीप जाधव सह प्राचार्य शिवाजी शिंदे. अभिनव मुख्याध्यापिका सोनाली देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.कर्मवीर एकनाथ भाऊ जाधव यांच्या जीवनावर संगीत शिक्षक दिलीपजी पागेरे व विशाल खुले यांनी गीत सादर केले. भाऊंचा परीसस्पर्श ज्याकुणास झाला त्यांचे सोने झाले तसेच शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची माहिती विलासजी देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली तर आध्यात्मिक व शैक्षणिक कार्याबद्दल विशाल खुले यांनी शिक्षक मनोगतात आपले विचार मांडले .भाऊंच्या जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपनाचे आयोजन हरित सेना प्रमुख उल्केश भोसले यांच्या तर्फे करण्यात आले होते फलकलेखन कलाशिक्षक सी. एफ. नाठे व धनंजय जाधव यांनी केले. कार्यक्रमास दीपक देशमुख. रवीआप्पा जाधव. एस एस जाधव सर. दीपक देशमुख. सोपान संधान. अशोक जाधव. सागर जाधव. योगेश जाधव सह गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन गोविंद बैरागी तर आभार ज्ञानेश्वर भवर यांनी मानले.
