
नाशिक: (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,ओझर (मिग) नाशिक येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. २०२६ साठी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी थीम *”वूमन इन सायन्स : कॅटलायसिंग विकसित भारत ” अशी असल्याने सायन्स असोसिएशन तर्फे भित्तीचित्र स्पर्धा आणि व्याख्यान घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या समन्वयक व भौतिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.वाय.सरदार यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामागील हेतू आणि कधीपासून सुरू झाला त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. डी. एस.बोराडे यांनी अध्यक्षीय मनोगतात सी.व्हि.रामन यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमा निमित्ताने महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कशिश इस्ते व ऐश्वर्या भालेराव यांनी ” वूमन इन सायन्स” या थीमवर आधारित मनोगत व्यक्त केले. ह्या दिवशी महाविद्यालयात दिलेल्या थीम वर भित्तिचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. प्रा.देठे आणि प्रा.श्रीमती. विश्वकर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.आभार प्रदर्शन प्रा.श्रीमती पूजा भंडारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.दुशिंग, प्रा.फड, प्रा.उगले, प्रा.छाया सुतार, प्रा.पल्लवी वाळके, प्रा.ससाणे, प्रा.खापरे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी कला विभाग प्रमुख प्रा.आवारे, आय.क्यू.ए. सी. प्रमुख डॉ. दुगजे, प्रा. ढिकले व सर्व प्राध्यापक बंधुभगिनी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी श्री मत्सागर, श्री.ढिकले, श्री.दरेकर यांनी सेमिनार हॉलमधील सर्व व्यवस्थेचे नियोजन केले.
