
सायखेडा:(प्रतिनिधी ) आज सोमवार दिनांक २/३/२०२६ रोजी मविप्र समाजाच्या जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मविप्र समाजाचे सभापती मा.श्री बाळासाहेब (आप्पा) क्षीरसागर हे उपस्थित होते.

तसेच प्रमुख अतिथी म्हणून निफाड तालुका संचालक मा.श्री शिवाजी आप्पा गडाख, मा.श्री सोमनाथ खरात युवा उद्योजक डेअरी पावर.श्री कमलाकांतजी महाराज अध्यक्ष उच्च माध्यमिक शालेय समिती,मा.श्री विजयजी कारे अध्यक्ष शालेय समिती.मा.श्री नितीन गावले अध्यक्ष शा.व्य समिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री प्रभाकरजी रायते मा.श्री जगन्नाथ कुटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, मा.राजेंद्र कुटे मा. दिलीप शिंदे,मा.बबन कळमकर मा.श्री विजय खालकर, सूर्यभान खालकर ,प्राचार्य श्री रामदास वाजे,उपप्राचार्य अहिरे मॅडम,पर्यवेक्षक श्री पगार सर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा मा.प्राचार्य श्री रामदास वाजे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री वाजे सर यांनी केले.प्रास्ताविकात वाजे सरांनी विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून व कला गुणांना वाव मिळावा व विविध स्पर्धांमध्ये संपादन केलेल्या यशाला कौतुकाची थाप मिळावी यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे,

असे प्रतिपादन केले. युवा उद्योजक सोमनाथ खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सर्व शिक्षकवृंदांचे कौतुक केले व आभार मानले .तसेच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर रहावे, व अभ्यास करावा असे आवाहन केले.वर्षभरातील विविध स्पर्धापरीक्षा,क्रीडा स्पर्धा,निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा , गायन स्पर्धा मविप्र सांस्कृतिक महोत्सव N.C.C संचलन अशा विविध प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. एस.एस.सी तसेच एच.एस.सी परीक्षेत उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच ऑलिंपियाड स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मा. प्राचार्य श्री वाजे सर, मार्गदर्शक शिक्षक श्री. चौधरी सर व मविप्र सांस्कृतिक महोत्सवात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर कर्पे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा.प्रभाकर रायते यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील AI तंत्रज्ञानाच्या आव्हानांना सामोरे जाणे विषयी मार्गदर्शन केले. निफाड तालुका संचालक.मा.श्री.शिवाजी आप्पा गडाख साहेब यांनी मविप्र संस्था कशा पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवते व विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले. मविप्र समाजाचे सभापती मा.श्री बाळासाहेब क्षिरसागर साहेब यांनी आपले अध्यक्षीय भाषणात मविप्र संस्था ही नेहमीच गुणवंत हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आयटीआय,डिप्लोमा,डिग्री सारखे विविध कोर्स करून युवा उद्योजक व्हावे,नोकरी करणारे न होता नोकरी देणारे व्हावे असे आवाहन केले. मविप्र समाजाच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजकांनी एकत्र येऊन 600 कोटीचे स्टार्टअप उद्योग उभे केले,याविषयी माहिती दिली तसेच शालेय व महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी व पालक यांना विद्यालयाने मार्गदर्शन केंद्र उभारून मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.बक्षीस वितरण कार्यक्रम समारंभाचे आयोजन सांस्कृतिक समिती प्रमुख श्री ज्ञानेश्वर कर्पे,श्रीमती.मोरेमॅडम श्रीमती वृषाली शिंदे, श्रीमती घुले मॅडम यांनी केले .सूत्रसंचालन श्रीमती प्रतीक्षा शिंदे व श्री.अवधूत आवारे यांनी केले.आभार प्रदर्शन श्री अशोक टर्ले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.फलक लेखन श्रीमती कापडी मॅडम व श्री महाले सर यांनी केले.
