
सिन्नर (प्रतिनिधी )मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे जाणकार,आयडियल प्राचार्य व कुलगुरू, माजी नगराध्यक्ष, खासदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ,समाजशील विचारवंत, पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे आधारवड आणि भाष्यकार, असंख्य लिहित्या हाताचे मार्गदर्शक आणि पुरोगामी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कणखर व्यक्ती, सातत्यपूर्ण लेखण -वाचन आणि भाषणातून ज्ञानाचा अखंड ज्ञानयज्ञ आयुष्याच्या शेवटपर्यंत जपून समाजाला मार्गदर्शन केले असे ज्ञानवंत लातूर -मराठवाडा-महाराष्ट्राचे भूषण, मराठी -हिंदी साहित्य चळवळीचे आधारवड, अंधश्रद्धा,सत्यशोधकी, वंचित उपेक्षित घटकांचे आधार आदरणीय डॉ.जनार्दन वाघमारे सरांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.लातूरसह,मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. डॉ.जनार्दन वाघमारे सरांचे कुटुंबिय आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य साथींना सावरण्याचे या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.
महामित्र परिवाराच्या वतीने भावपूर्ण अभिवादन.
