
नांदगाव ( प्रतिनिधी ) येथील हनुमान नगर पारिजात कॉलनी मध्ये मोठ्या उत्साहात होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला होळीच्या या पवित्र अग्नीत वाईट व कुविचारांचे दहन करण्यात आले
आणि चांगल्या विचारांना आत्मसात केले पाहिजे असा संदेश यावेळी देण्यात आला.

नवीन पिढीतील लोकांना सण आणि उत्सवाची माहिती व्हावी आणि ते का साजरे केले जातात याची जाणीव व्हावी या उद्देशाने यावेळी माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन होळीच्या निमित्ताने परिसर स्वच्छ करण्यात आला आणि त्यातून स्वच्छतेचा संदेश ही देण्यात आला अशा सणांचा आणि उत्सवांचा व परंपरेचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे असे यावेळी संबोधित करण्यात आले

. यावेळी होळीची विधिवत पूजा करून परिसरातील बायकांनी पुरणपोळीचा नैवेद्य व खोबऱ्याची वाटी अर्पण केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारिजात कॉलनीतील नागरिक स्री, पुरुष, व मुलांनी होळी सणाचा आनंद लुटला.
