
मुळडोंगरी ( प्रतिनिधी ) २७ फेब्रुवारी मराठी भाषेचे थोर साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक मान.श्री. एस जी राठोड साहेब सचिव सिद्धांत दादा राठोड यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस एस मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कवी,कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.एस्.एस्.पगार सर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले त्यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगितले.त्यांनी कवी कुसुमाग्रज यांची “कणा”ही कविता सादर केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापिका सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
