
नाशिक (पंचवटी) : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजी येथे “Health is Wealth” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत सह्याद्री हॉस्पिटल यांच्या सहकार्याने सर्व कर्मचारी व स्टाफसाठी मोफत मेडिकल चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविण्यात आला.

या आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, बीएमआय, सामान्य आरोग्य तपासणी आदी सेवा तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या. शिबिराला महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सीईओ डॉ. यादव यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांनी सांगितले की, “संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा महाविद्यालयाचा कणा आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यामुळेच कामाची गुणवत्ता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळे अशा उपक्रमांमुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढते आणि ‘Health is Wealth’ ही संकल्पना अधिक दृढ होते.”

यावेळी सीईओ डॉ. यादव यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “संस्था केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादित नसून कर्मचारी व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारीही तेवढीच महत्त्वाची मानते. नियमित आरोग्य तपासणीमुळे आजारांचे लवकर निदान होऊन निरोगी कार्यसंस्कृती निर्माण होण्यास मदत होते.”

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी योगेश संधान व योगेशवर जाधव तसेच सह्याद्री हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक, महाविद्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. हा उपक्रम आरोग्याबाबत जागरूकता वाढविणारा आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचा ठरला. या आरोग्यदायी उपक्रमाचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घेतला
