
सिन्नर ( प्रतिनिधी ) कर्मवीर भाऊसाहेब हिरे कुळ कायदा जनक यांनी सहकाराच्या माध्यमातून तसेच त्याची जमीन या क्रांतिकारी धोरणामुळे शेतात राबणारा शेतकरी हेच मजूर जमीन मालक बनले. राज्याचे पहिले महसूल मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जनतेला आदर्श आहे. त्यांच्या विचाराचा वारसा बहुजनांनी जपावा तसेच त्यांचे प्रेरणादायी सामुहिक शिल्प नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारावे जेणेकरून आजच्या पिढीला ते आदर्शवत बनवेल असे आज रविवार दिनांक ०१/०३/२०२६ रोजी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रांगणातील परिसरात आयोजित “कर्मवीर भाऊसाहेब हिरे” यांच्या जयंतीनिमित्त प्रसंगी महामित्रचे दत्ता वारुळे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे व क्रांतिवीर वसंतराव नाईक या जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याची उभारणी ही पुढील पिढी यांच्या उद्धाराच्या ठरल्या असे वायचळे म्हणाले.
याप्रसंगी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास दत्ता वायचळे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या हस्ते पुष्प मालेने मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी बाजार आवारातील शेतकरी आदर्श मुतडक, उत्तम डावरे, शिवाजी बुचकुळ,तसेच बाजार समितीचे कर्मचारी सचिन बाळदे,विजय कोकाटे, योगेश गोळेसर, सोमनाथ चव्हाणके, सुभाष पाटोळे,संजय डावखर,लहाणु तांबे,राहुल पवार,शशी भोळे,आदी हजर होते.
