
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१९६ वा दिवस
तरुणांनो ! आपल्या देशातील गरीब, अज्ञानी, दिन-दलित यांच्याशी पूर्ण सहानुभूतीने वागा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करा. बुध्दावतारात ज्यांनी सरदार मानक-यांचे निमंत्रण बाजूला सारून एका वेश्येचे आमंत्रण स्विकारले व तिचा उध्दार केला. त्या भगवंताला भक्तीपूर्वक साष्टांग प्रणाम करा. त्यांचा थोर आदर्श समोर ठेवून सतत कार्य करत रहा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १० शके १९४७
★ फाल्गुन शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १ मार्च २०२६
★ १९०५ महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री, कुळ कायद्याचे जनक, कर्मवीर भाऊसाहेब यांची जन्मदिन.
★ १९२२ महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिन.
★ १९८९ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखान्यांचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा स्मृतीदिन
★ जागतिक नागरी संरक्षण दिन.
