
नाशिक जिल्हा प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन
महाराष्ट्र राज्य शासनाचे वतीने नाशिक येथे आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलन म्हंणजे “जुनीच दारु व नवी वाटली” असा प्रकार असुन हया निमित्ताने केवळ महाराष्ट्रीयन करदात्याची पैशाची धुळधाण या निमित्ताने होत असल्याची खरमरीत टिका अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक चे जिल्हाध्यक्ष तथा सुप्रसिध्द साहित्यिक नवनाथ अर्जुन पाटिल गायकर यांनी केली.
या उत्सवी सोहळयातुन केवळ राजकारणी व तेच तेच प्रस्थापित असलेले साहित्यिक चेहरेच चमकत आहे. या उलट गावकुसातलं ग्राम्य साहित्य , दलित, आदिवासी व प्रवाहाबाहेरील साहित्य व साहित्यिकानां या संमेलनात केवळ बघ्याच्या पलिकडे कुठलेही स्थान मिळालेले नाही. ही घोर उपेक्षा व स्थानिक प्रतिभावंताचा घोर अपमान आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर कधीच प्रस्थापिताचां उत्सवी सोहळा बनलेला आहे.यातुन करोडोचा चुराडा होतो व माय मराठीच्या पदरात काय पडते हा संशोधनाचा विषय आहे.
हे कमी होते कि काय म्हणुन विश्व मराठीचे नावाखाली पैशाची उधळपट्टी नव्याने सुरु झाली आहे.
नाशिक शहर व जिल्हयात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक, नाशिक कवी, साहित्ययान, सुर्योदय यासह कितीतरी संस्था साहित्य क्षेत्रात तेजाने तळपत आहे. यासह तालुका पातळीवर ही किती तरी छोटया मोठया संस्था कार्यरत आहेत.
विशेष म्हंणजे शासनाचा एक रुपयाही न घेता या संस्था लोकसहभाग व पदरमोड करुन वर्षभर सतत कार्यक्रम करत असतात.या संस्थाचे माध्यमातुन नाशिक जिल्हयात दिग्गज साहित्यिकाचीं फळी उभी राहिलेली आहे.
दुर्दैवाने शासनाने मात्र या तळागाळात काम करणार्या साहित्यिकाचीं कुठलीही दखल न घेता त्यांना उपेक्षितच ठेवले आहे.
राज्याचे मराठी भाषा मंत्री ना.उदय सामंत व म.वि.प्र. संस्था यांचा यात सहभाग असल्याने या संपुर्ण संमेलनास राजकिय वळण व छाप पडली आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेच प्रतिरुप यात दिसले असुन , यात नवे वेगळे असे काय आहे किंवा होते ? व यातुन नेमके काय साध्य होणार आहे असा खरमरीत सवालही गायकर यांनी केला आहे.
परिषदेचा संमेलनावर बहिष्कार
नाशिक मधल्या या संमेलनाकडे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने पुर्णत; पाठ फिरवली आहे.गर्दीचे म्हणाल तर साहित्यिकापेक्षा राजकिय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचीच जास्त गर्दी दिसुन आली आहे असा दावा गायकर यांनी केला आहे.
