
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य श्री आर. व्हि. वाजे उपमुख्याध्यापिका श्रीम. अलका अहिरे पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार व शिक्षकवृंद.
सायखेडा :- ( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन विविध शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. महान भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांनी शोधलेल्या ‘रामन परिणाम’ या संशोधनासाठी मिळालेल्या नोबेल पारितोषिकाच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन,जिज्ञासा आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री रामदास वाजे हे होते. उपमुख्याध्यापिका अलका अहिरे, पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार तसेच विज्ञान शिक्षक श्रीम घुले मॅडम, श्रीम.भारस्कर मॅडम श्री चौधरी सर श्रीम बागले मॅडम श्रीम आरोटे मॅडम श्रीम मोगल मॅडम श्रीम जाधव श्री भंडारे सर आदी शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक विद्यार्थिनी वेदिका जाधव हिने केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत, विज्ञान कोडी, प्रश्नमंजुषा तसेच विज्ञान नाटिका सादर करून कार्यक्रमात रंग भरला. इयत्ता सातवी अ च्या विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेवर आधारित प्रभावी नाटिका सादर करून विवेकाची जाणीव करून दिली, तर इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरणातून भविष्यातील विज्ञानाची दिशा दाखवली.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विज्ञान दिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत मांडले.विज्ञान शिक्षका श्रीम घुले मॅडम यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनशैली आहे, असे सांगितले.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य श्री रामदास वाजे यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान,संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि नवनवीन कल्पना मांडण्याची सवय लावली पाहिजे.अंधश्रद्धा दूर करून तर्कसंगत विचार स्वीकारणे ही काळाची गरज आहे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान विषय समिती व विज्ञान छंद मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी केले.
