
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात मराठी राजभाषा दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर
सायखेडा 🙁 प्रतिनिधी ) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या उक्तीप्रमाणे,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.याप्रसंगी भाषेचा वारसा जपण्याचा आणि वाचन संस्कृती जोपासण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. व्हि. वाजे हे होते.प्रारंभी सरस्वती पूजन आणि कवीवर्य कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मा प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मा उपमुख्याध्यापिका अलका अहिरे, पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार मराठी समितीचे सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोहाड सर यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री वाजे सर म्हणाले की, “मराठी केवळ एक भाषा नसून ती आपली संस्कृती आहे.भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. तरच मराठी भाषा जगभरात आपले उच्च स्थान टिकवून ठेवू शकेल. यावेळी इयत्ता ७वी अ वर्गातील विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री संजय भोई यांनी कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या साहित्याविषयी माहिती शिक्षक मनोगतातून सांगितली, तसेच त्यांच्या नटसम्राट या अजरामर नाटकाविषयी अधिक माहिती दिली. श्रीमती मोरे मॅडम, श्रीमती पी. पी. शिंदे मॅडम यांनी काव्यवाचन केले. अभिनय बालविकास मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन विजय धनवटे यांनी केले तर आभार श्रीमती आगळे मॅडम यांनी मानले. फलख लेखन श्रीमती कापडी मॅडम व श्री महाले सर यांनी केले. यावेळी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल
