नाशिक ( प्रतिनिधी)- नाशिक सहकारी कारखाना कार्यस्थळावरील नासिक सर्व सेवाभावी ट्रस्ट संचलित माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या काव्यसादरीकरणातून कवितांचा जागर करण्यात आला
प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पगार, शिक्षक-कर्मचारीवृंद यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यालयातील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कवितांसह विविध कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगितले. शिक्षक-कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांस्कृतिक विभागप्रमुख कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले