
चापडगाव ( प्रतिनिधी ) शेवगाव तालुक्यातील चापडगावच्या जिल्हा परिषद शाळेत मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली ते चौथीतील सुमारे ५१ बालकवींनी बहारदार स्वरचित कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमाला आगळ्या वेगळ्या उंचीवर नेऊन बालश्रोत्यांसह शिक्षक व प्रमुख अतिथींना काव्यरसाने अचंबित केले.

प्रारंभी कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे एकता फौंडेशनचे अध्यक्ष कविवर्य प्रदीपजी बोडखे यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करून कविसंमेलनास सुरुवात केली. बाल चिमुकल्या कवींनी आई बाबा छत्रपती शिवराय फुल मैत्री घर पोपट गाय जंगल पक्षी मळा गुरुजी आकाश टिचर माता जिजाऊ शाळा सैनिक परसबाग बाजार झाड मनीमाऊ मोर पाणी माती आदि विषयांवर प्रबोधक व महत्त्व सांगणाऱ्या काव्यरचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली .

शिक्षक कविवर्य गवाजी बळीद यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झालेल्या बालकविसंमेलनात गायत्री दिवटे समर्थ भिसे समर्थ पोपळे देविका गोरे प्रांजल वाल्हेकर स्वरा गोरे शिवानी डाके मोहिनी दातीर सोहम शेकडे असद शेख भक्ती गोरे शिवम गायकवाड सूरज जगताप तेजस पातकळ श्रुती जगताप समर्थ मडके दत्तु निर्मळ हिंदवी मडके तनुजा गोरे श्रुतिका पातकळ संचिता जाधव
रोहित हराळकर तीर्थराज भिसे ईश्वरी नाईक समर्थ पातकळ सोनाक्षी कोळगे आदिती गोरे विद्या शेंडगे रिजवान शेख संविधान शेंडगे शिवम दातीर श्रेयस दारुणकर सुदीक्षा नेमाने ओंकार लोखंडे स्वरा जाधव कैवल्या पाटील वृषभ भंडारी स्वराज जगताप आरुष कोलते प्रेमराज गोरे श्रवण बोंबले समर्थ गोरे मोहित हराळकर आरती निर्मळ तेजल मराळ रूद्र मडके आराध्या नेमाने प्रथमेश नेमाने या बाल कवींनी रसाळ काव्यरचना सादर करून कविसंमेलनाची लज्जत वाढवून सर्वांना मंत्रमुग्ध केले .
प्रथमेश नेमाने या विद्यार्थ्याने “चला इस्त्रोच्या गावाला जाऊ ” ही कविता सादर करून सर्वांना विमानप्रवासाचा अनुभव दिला .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य प्रदीपजी बोडखे यांनी ” महापुरुषांना समजून घेतांना ” या कवितेतून जयंती उत्सवाच्या काळात धांगडधिंगा टाळून विचारांचे पूजन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले . ज्ञानाचा खरा उपयोग जिल्हा परिषद शाळांमधून समाज हितासाठी होतांना दिसतो .
संयोजक कवी गवाजी बळीद व सहकाऱ्यांनी मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या बालकवि संमेलनाने दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून चापडगाव शाळेचा लौकिक तालुक्यात वाढविला असल्याचे गौरवोद्गार कविवर्य प्रदीप बोडखे यांनी काढले.
दरम्यान आपल्या वाढदिवसानिमित्त अभियंता गौरव भगत यांनी अवास्तव खर्चास फाटा देऊन नारळाची तीन झाडे शालेय आवारात लागवड करून विद्यार्थ्यांसह झाडांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी भगत मॅडम साक्षी नलवडे यांनी विद्यार्थ्यांना केळी वाटप केले . याप्रसंगी अभियंता सोमेश्वर नलवडे यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाचा मतितार्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगत शाळेच्या वैभव व उपकमांबद्दल समाधान व्यक्त केले .
कार्यकमाचे संयोजक कवी गवाजी बळीद यांनी मराठी भाषा टिकली तरच गोरगरीबांना वंचित उपेक्षितांना वाघिणीचे दुध देणारी मराठी शाळा टिकणार आहे . वाचनाची गोडी वाढवून प्रतिष्ठित सुजाण समृद्ध नागरिक घडविणे हा बालकविसंमेलन आयोजित करण्यामागील हेतू असल्याचे स्पष्ट केले . शब्दांची सुरेख गुंफण करून आपल्या मनातील काव्यरचना दिलखुलासपणे मांडण्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या अंर्तमनातून आलेला निर्मळ नितळ काव्यप्रवाह असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले . सोबतच कवी गवाजी बळीद यांनी “दिन गौरवाचा ” व “माझ्या परसबागेत ” या कवितांचे गायन करून श्रोत्यांना कवितेच्या जगात नेऊन आनंदी केले .
कार्यकमाच्या यशस्वितेसाठी बाबासाहेब हरदास रविंद्र घनवट यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन मुख्याध्यापक तुकाराम भगत यांनी तर कविसंमेलनाचे सुत्रसंचालन दादासाहेब चव्हाण व मंजुश्रीताई खंडागळे मॅडम यांनी केले .
बालकविसंमेलनातील सर्व सहभागी बालकविंना उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख अतिथिंच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले आभार प्रदर्शन अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कारभारी नाचन सर यांनी केले .
