
ओझर: ( वार्ताहर )राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे, विश्व सत्य कॉलेजचे प्राचार्य एम ए भदाणे, उपप्राचार्य डॉ अर्चना सुरसे, प्रा राजीव देशमुख प्रा सुनिता चौधरी प्रा प्राची देशपांडे विज्ञान शिक्षक अहिरे व्ही एस, देवरे एस पी, शिंदे ए आर, गायकवाड बी डी, डेरले एन व्ही, कदम यु एन, शिंदे व्ही बी, चौधरी एम व्ही, कावळे एस एस, सोनल माळोदे, भंडारे एस ए, घुमरे ए यु, मोहन आर पी, शिंदे टी एल, रकिबे एन ए आदी उपस्थित होते. विज्ञानछंद मंडळ अंतर्गत संपादक देवरे एस पी यांच्या मार्गदर्शनातून विज्ञान हस्तलिखितचे प्रकाशन करण्यात आले. संपादक मंगल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पक्षी सृष्टी या मराठी हस्तलिखिताचे प्रकाशन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. विज्ञानावर आधारित रांगोळी स्पर्धा व नाटिका सादर करण्यात आली.

विविध उपक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस मुख्याध्यापकांच्या हस्ते देण्यात आले. फलक लेखन सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन नरेंद्र डेरले यांनी केले. आभार मोहिनी चौधरी यांनी मानले.
