
नगरसेवक अजिंक्य साने व्यास पीठ वरून मनोगत व्यक्त करताना, डावीकडून जेष्ठ साहित्यिक सुहास टिपरे व भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल संयोजक प्रा. अविनाश बल्लाळ सर!
नाशिक ( प्रतिनिधी ) ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे नाशिकचे सुपुत्र. त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल विश्वात त्यांच्या काळजाला भिडणाऱ्या कविता वाचल्या जातात आणि गुणगुणल्या जातात. स्वातंत्र्यवीर सावरकर, कानेटकर इत्यादी महान लेखक, कवी यांना जन्म देणारी ही नाशिकची पवित्र भूमी आहे, असे गौरवोद्गार प्रभाग क्रमांक 30 चे मनपा नगरसेवक advocate श्री अजिंक्य साने यांनी. मराठी भाषा गौरव दिना निमित्त इंदिरानगर येथील सावानाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या वाचक व मराठी भाषा प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत advocate साने बोलत होते. आगामी काळात इंदिरानगर येथे नाट्यगृह व वाचनालय याची भव्य वास्तु उभारण्यासाठी मनपा येथे पाठपुरावा करून इंदिरानगरच्या सांस्कृतिक वारसाला साजेशी भव्यता निर्माण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
भाजपा सांस्कृतिक आघाडी, नाशिक यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, तरुण व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रत्येक उपस्थितांनी मराठी कविता किंवा लेख किंवा लघुकथा सादर केली. शिरीष जोशी यांनी स्वा सावरकर याच्या jayostute हे गीत बासरीवर सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ श्रद्धा भुरे यांनी महाराष्ट्र गीत म्हणुन केली. श्री सुहास टिपरे यांनी सूत्र संचालन व कविता सादर केली. भाजपा सांस्कृतिक आघाडीचे संयोजक प्रा. अविनाश बल्लाळ यांनी मनोगत व्यक्त केले व वाचन चळवळ उभारण्याचे आवाहन केले. श्री सुधाकरराव गायधनी, रमेश मोडक, शिरीष भालेराव, विवेक उपासनी, आशा बल्लाळ, खरे मॅडम, adv गायधनी, श्री व सौ बोबडे, सौ सहस्त्रबुद्धे, श्री गोविंद केंगे, भूषण राजे, शुक्ल, शर्वरी बल्लाळ, खिस्ते भगिनी व इतरही अनेक आबालवृद्ध कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
एकसुरात पसायदान म्हणुन कार्यक्रमाची सांगता झाली….
