
नांदगाव( प्रतिनिधी)येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 28/ 02/2026 रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य निर्माण करतो. विज्ञानाने जगातील कुठलाही प्रश्न सुटू शकतो हे सिद्ध झालेले आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती बाळगावी व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
वरिष्ठ महाविद्यालयाचे
विज्ञान शाखेचे विभागप्रमुख डॉ. के.आर.खंदारे यांनी प्रास्ताविकातुन विज्ञानाचे महत्त्व विशद केले व विज्ञानवादी विचारसरणी अंगीकारण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाविद्यालयात विविध वैज्ञानिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक प्रा.आटोळे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले. प्रा.एस.एन.भागवत यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.बी.पी.मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
